साथ तू देशील का...


 साथ तू देशील का...?

नुसतीच रंगवतो स्वप्ने
पूर्ण ती होतील का
रंगून जाण्यास स्वप्नात
साथ तू देशील का

तुझ्याशिवाय नाहीच
पाहिलं कुठलं स्वप्न
तुझही आहे काम ते
नयनात तसंच जपणं

प्रत्येक स्वप्नपूर्तीची आता 
आस मनी आहे
या भुकेलेल्या मुखातील
घास कुणी आहे

स्वप्नही असे काय
जगावेगळे नाही
तुझे माझेच ते
संसारावेगळे नाही
✍️✍️✍️✍️✍️
पोलीस उपनिरीक्षक
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो:- 8424043233

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत