पोलीस
मी तर आहे एक
सामान्य पोलीस.........
सण उत्सव साजरे
करतात लोक सारे
पोलीस मात्र देतात
रात्रंदिवस पहारे
समाज रक्षणासाठी
शक्ती सारी दिलीस........
मी तर आहे एक सामान्य पोलीस..
कधी दंगली कधी जाळपोळ
तर कधी होतात बॉम्बस्फोट जबरी
दरवेळी वाट पाहतात आमची
आव्हानाने खोदलेल्या कबरी
या आव्हानांसाठी जिद्द ही
पराकोटीला नेलीस.....
मी तर आहे एक सामान्य पोलीस..
संसार आधी की
कर्तव्य आधी
मनात दुविधा असते
मरणाला कवटाळतो आम्ही
इच्छा आमची विधवा असते
अशी का भावनांची
होळी तू केलीस.....
मी तर आहे एक सामान्य पोलीस..
लहान बछडी पाहतात वाट
पप्पा कधी येणार
कर्तव्याच्या सीमा अफाट
नाती कशी जपणार
अशी का असावे तू
दु:खासोबत पीलीस......
मी तर आहे एक सामान्य पोलीस..
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ (राहुल)
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233
टिप्पण्या