होताना मी निवृत्त
होताना मी निवृत्त
हरले माझे चित्त
नजर फिरवावी तिकडे
डोळ्यासमोर धुके आहे
अश्रू झालेत बोलके
शब्द मात्र मुके आहे
डबडबल्या डोळ्यांनी मी
आज निरोप घेतो तुमचा
काही चुकलं असेल तर
गुन्हा पोटात घाला आमचा
खूप चढ उतार पाहिले
माझ्या या नोकरीत
रक्तपेक्षा जिवलग नाती
साठवली काळजाच्या पोकळीत
आज जड पावलांनी जेव्हा
सोडतो आहे मैदान
आठवतो तो क्षण भरतीचा
होतो जेव्हा नादान
जगण्याचा संघर्ष अन
वेगळं अस्तित्व मिळालं
बदलून गेलं जीवन असं
नोकरीच सत्व मिळालं
अंगावरची वर्दी हि
उतरून जाईल आज
तीच्यामुळेच शोभून दिसला
हा जीवनाचा साज
वडीलांसारखे अधिकारी अन
भावासारखे सहकारी लाभले
आज हर्ष होत आहे मनातून
पण विरहाचं दुःख मात्र दबले
आज पुष्पगुच्छ तुमच्या हाती अन
टाळ्यांचा गडगडाट आहे
एकट्याचाच प्रवास इथून पुढे
जीवनाची बिकट वाट आहे
जीवनाची बिकट वाट आहे
अजय द चव्हाण
उर्फ (राहुल)
खाकी वर्दीतला दर्दी कवी
8424043233
टिप्पण्या
भावी वाटचालीसाठी शुभेच्छा
आणि पुन्हा एकदा छान शी कविता अजय भाऊ
सोडतो आहे मैदान
आठवतो तो क्षण भरतीचा
होतो जेव्हा नादान kharch Sir he kadwe mla khupch aawale....bharticha pahila diwas aathala mla....agdi dolyat pani aale mazya
Manala hurhur lawnari hi kavita
Kharch kartvyachya nirop ghet astanna
Hridyala bhidnari ahe