प्रीतीची शपथ तुला आता तरी धाव रे..........



प्रीतीची शपथ तुला
आता तरी धाव रे..........

आठवता सारे काही
रडू न आवरे
प्रीतीची शपथ तुला
आता तरी धाव रे..........

तू नसता उदास सारे
अंगावरी येती शहारे
मी उदास क्षणही उदास
उदास भासतो गाव रे.....
प्रीतीची शपथ तुला
आता तरी धाव रे..........

स्वप्नात तू येतो 
पापण्यात  रहातो
श्वासागणिक मला
तुझाच भास होतो
तू येशील कधी ही
आस मना दाव रे........
प्रीतीची शपथ तुला
आता तरी धाव रे..........

विरह मला तुझा 
काट्यापरी टोचतो
घायाळ करुनी तो
थेट हृदयी पोचतो
थांबेल वेदना परी
भरेल का घाव रे........
प्रीतीची शपथ तुला
आता तरी धाव रे..........

धावत ये असा अन
मार ना मिठी
ओठांना अलगत
टेकव ना ओठी
घे मिठीत अन
उलगडुदे मनातील भाव रे.....
प्रीतीची शपथ तुला
आता तरी धाव रे..........

ये लवकरी आता 
घाल करांची बेडी
आतुर जीव होई 
बावरते ही वेडी
वेड लागले तुझे
बदनाम झाले नाव रे......
प्रीतीची शपथ तुला
आता तरी धाव रे..........

अजय दत्तात्रय चव्हाण 
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत