चंद्र आपला

आली असेलच संध्या आता
अंधार पाठीवर घेवून
तू बसली असशील
 चंद्र आपला कुशीत घेऊन

नुकत्याच त्याने प्यायल्या
 असतील अमृत धारा
त्याच्या जगात धुंद  तो
 एकटाच अजाणता तारा

लोहाराच्या भात्यासारखी 
हलवीत मांडी
तुझ्या मनाच्या चांदण्या
गात असतील अंगाई

आली असेलच ओठावर त्याच्या
पाहुणी बनून जांभई
अजून तर एवढासाच आहे तो
म्हणेलच ना उद्या बाबा आई

झोपलाच असेल तो 
जग सार मुठीत झाकून
थकला असेल बिचारा
चांदमामाची हरणांची गाडी हाकून

तो हसला असेल
 नाजूकश्या चिमण्या ओठात
पऱ्या भेटल्याच असतील त्याला
पंखवाल्या स्वप्नात 

त्याच गोंडस देखणं रूप
तुझ्या डोळ्यात नीट साठऊन ठेव
काही साम्य असेलच आमच्यात
फक्त तू नीट आठवून ठेव


अजय दत्तात्रय चव्हाण 
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत