माझी कविता कधी तुला
माझी कविता
माझी कवीता कधी तुला......
पाखराचं गाणं देईल
नाजूकश्या गालात हसणाऱ्या
लेकराचं जिणं देईल
माझी कविता कधी तुला........
स्वप्नांचा झुला झुलवील
कधी प्रेमाने गोंजारत
फुलाप्रमाणे फुलवील
माझी कविता कधी तुला........
हृदयातील श्वास देईल
मैत्री म्हणजे टिपूर चांदणं
असा दृढ विश्वास देईल
माझी कविता कधी तुला......
सर्वस्व अर्पण करील
तुझ्या हसऱ्या चेहऱ्यासाठी
उभ्या देहाचं दर्पण करील
तुझ्या हसऱ्या चेहऱ्यासाठी
उभ्या देहाचं दर्पण करील.
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233
टिप्पण्या