पहिला पाऊस


पहिला पाऊस

सखे पहिला पाऊस जेव्हा
मी अंगावर झेलत असतो
तुझा विरह काट्यासारखा
नयनात सलत असतो

तू दिल्येल्या आठवणींचा ओलावा  
अजूनही आहे सुगंधित 
हरवून जातो असाच मी
या कल्पनेच्या धुंदीत



सखे तुझ्या सहवासात तेव्हा
श्वासही भिजला होता
घेताना मिठीत तुला 
तो गुलमोहर ही लाजला होता


सखे नेहमी असे वाटते
पहिल्या पावसात
 तू मी सोबत भिजावं 
पाहून आपलं प्रेम
ते फुलपाखरू लाजावं

आज पुरता ओलाचिंब झालो
तुझ्या विरहाचे दुःख गिळताना
आज पुन्हा एकदा वीज हसली
मला एकांतात छळताना


अजय द चव्हाण
उर्फ राहुल 
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत