आयुष्यभराच लेणं

आयुष्यभराच लेणं

बालपणं त्यांचं जाईल
असच भुर्रकन उडून
एक दिवस चिमण्या या
जातील घरटं सोडून

कुणी म्हणत पिलू
कुणी म्हणत चिऊ
कळवळणार हृदय म्हणत
आम्हा  सोडून नका जाऊ

बोट धरून चालणं
अन तिचे बोबडे बोल
सोडून जात पिलू तेव्हा
अंतरात जखम असते खोल

तिच्या मिचमीच्या डोळ्यात
अख्ख जग सामावलेलं असत
सुन्न आपलं जग अन
सारं गमावलेलं असत

मुली म्हणजे असतात म्हणे
परक्या घरचं देणं
एका क्षणात निसटून जात
हे आयुष्यभराच लेणं

मुलगी नको म्हणनांऱ्यान्नो
होऊद्या जरा पापणी ओली
किती गोंडस वाटतात ना
या फोटो मधल्या मुली

�✍�✍�✍�✍�✍�
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ (राहुल)
खाकी वर्दीतील  दर्दी कवी
8424043233

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत