कधी नाही केली वारी पंढरीची





कधी  नाही केली
वारी पंढरीची
ऐक बा विठ्ठला ही
हाक अंतरीची

तुझ्या विटेवरी 
टेकला न माथा
काय सांगू पांडुरंगा
जीवाची या व्यथा

तुझ्या पंढरीचा थाट
 पहिला ना कधी
सामाविन तुझी मूर्ती
काळजामधी 
  

चंद्रभागेच्या तिरी
नाही केले स्नान 
टाळ मृदंगा संगे
व्हावे धुंद मन

असा मी अभागी 
तुला विनवितो 
चला पंढरीला 
श्वास हा बोलतो

तुझ्या मस्तकीचा 
पाहीन मी टिळा
भक्तीचा भुकेला
भक्त हा भोळा

तुझ्या चरणाशी 
सांडेन मी श्वास
सार्थकी लागेल तेव्हा
या जन्मीचा प्रवास

शब्दरचना
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत