शिवछत्रपती राजे




शिवछत्रपती राजे


दिगंतातून डंका वाजे
जय शिवछत्रपती राजे
आठवून कार्य त्यांचे 
रक्त उसळते माझे


सह्याद्रीचा सिंह हा
शक्ती ही मर्द मराठी 
उधळून प्राण फुले
वाहीन जीवन त्यांच्याचसाठी


हाती भगवा अन
मस्तकी असे चंद्रकोर
पाषाण ही फोडू असा
मनगटी असे जोर


स्वराज्याचा मावळा मी
शिवचरणी झुकतो माथा
काय सांगू गड किल्ले अन
मराठी पराक्रमाची गाथा



हिंदवी स्वराज्य स्थापिले 

सोबत अठरा पगड जाती
नसनासातुनी आदर राजांचा 
पावन झाली ही दख्खन माती


सह्याद्रीच्या कडी कपारीला
अभिषेक झाला शिवस्पर्शाने 
धन्य झाला मावळा हा
शिवगीत लेखन हर्षाने 


शिवछत्रपती नाद घुमतो 
हर एक श्वासातुनी
पुन्हा जन्मावे राजे तुम्ही
या सह्याद्रीच्या कुशीतुनी


पुन्हा जन्मावे राजे तुम्ही
या सह्याद्रीच्या कुशीतून


अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
खुपचं सुंदर ओळी रचल्यात मेजर
Unknown म्हणाले…
खुपचं सुंदर ओळी रचल्यात मेजर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत