ओझं आनंदाचं
*ओझं आनंदाचं*
बेरंग होतो आज मी
रंगात रंगून देखील
कोडं पडलं असं
मनातलं सांगून देखील
मजवरी असे उडाले
तुझ्या प्रीतीचे रंग
न खेळून देखील होळी
भिजले माझे अंग
मनही रंगले
मी ही रंगलो
तुझ्या होकारास्तव
पुन्हा जगलो
थोडं तू थोडं मी
रंगवलं असं
ओझं आनंदाचं आज
वागवलं कसं
आनंद ही आज मला
वाटला मनाचं ओझं
इतर दिवशी सोबतीला
दुःखच असतं माझं
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233
टिप्पण्या