आठवणी शाळेच्या
फीरून त्या आठवणीनां मिळतो कसा उजाळा
नजरेस पडते जेव्हा आपल्या गावची शाळा
पांढरा half शर्ट आणि चड्डी होती खाकी
करगोटा चढवायचा तेवढा असायचा बाकी
पांढरी पेन्सिल आणि काळी होती पाटी
पाया मजबूत हवा ना जीवन संघर्षासाठी
गांधी टोपी डोक्यावर अन
शेम्बुड असायचा नाकाला
घाबरायचो ना आम्ही
शेवाळे गुरुजींच्या धाकाला
आज इतके मोठे झालो पण
शाळेत जायचा मोह आवरत नाही
चिमूकल्यांना डोळ्यात भरताना
आपले बालपण मिरवत नाही
जशी असते आपली आई तशीच
असते ना आपली शाळा
कितीही मोठे झालो आपण तरी
तिच्याबद्दल असतोच ना जिव्हाळा
✍✍✍
अजय द चव्हाण
उर्फ (राहुल)
आठवण प्राथमिक शाळा मानेकॉलनी
टिप्पण्या