आज शोभून दिसतो माझा वाढदिवस खरा
आज शोभून दिसतो माझा
वाढदिवस खरा
अंधाराच्या कुशीतून
अंकुरावा जन्मदिवस
मग मी ही ईश्वराला
बोलीन एक नवस
तुझाच आशीर्वाद
पाठीशी असुदे जरा.....
आज शोभून दिसतो माझा
वाढदिवस खरा......
फुलांनी सुगंधित करावं वातावरण
अन फुलपाखरांनी रंग द्यावे
लाटांनी गुणगुणावं गाणं
अन पाखरांनी पंख द्यावे
असे हे सोनेरी क्षण अन
मुठीत आसमंत सारा.....
आज शोभून दिसतो माझा
वाढदिवस खरा......
नदीन वाहत रहावं
वाऱ्यान गात राहावं
आज सजलेल्या क्षणांना
नयनात सामावून घ्यावं
फुगे फुटतील अंगावर
पडतील चकमक धारा ....
आज शोभून दिसतो माझा
वाढदिवस खरा....
आज कोसोदूर आहे
जिथं जन्मलो ती माती
अन आयुष्यभर जपलेली
आपुलकीची नाती
तरीही मनात प्रेम अन
आठवणींचा वाहतो झरा.....
आज शोभून दिसतो माझा
वाढदिवस खरा.....
ध्येय माझ्या डोळ्याशी अन्
जिद्द उराशी असेल
लेखणी माझी तलवार अन्
हृदयात झाशी असेल
मग माझ्याही प्रयत्नांना येईल
यशाचा गोंडस तुरा .......
आज शोभून दिसतो माझा
वाढदिवस खरा......
सूर्याने पसरावेत
किरणांचे सोनेरी हात अन्
सदैव स्मरणात राहावे
पंचवीस सात
✍�
HC/194 अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ (राहुल)
खाकी वर्दीतील दर्दी कवी
*मो* 8424043233
टिप्पण्या