स्वप्न मुलांचे
स्वप्न मुलांचे
(बालगीत)
असे वाटते मुलांना
पंख असावे परीसरखे
उंच जावे आकाशात
उडुनी घारीसारखे
सर सर चढावे झाडावरती
पिटुकल्या खारीसारखे
असे वाटते मुलांना
फुलांनी वाऱ्यास सजवावे
पाऊस बनूनी ढगांचा
सूर्यास भिजवावे
असे वाटते मुलांना
चंद्रासंगे खेळावे
सारे तारे त्यांना
मुठीत मिळावे
हसुनी तारे सारे
स्वप्न मुलांचे व्हावे खरे
शब्दरचना
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233
टिप्पण्या