आकांक्षापूर्ती 


फक्त एक दिवस द्या मला 
माझ्या आकांक्षापूर्तीसाठी

मी चलबीचल झालोय 
त्या एका सोनेरी क्षणासाठी
माझ्या कवीतांनी बहरलेल्या
पुस्तकांच्या पानासाठी

उत्कंठा शिगेला पोहचलीय
डोळ्यांचे पारणे फेडण्यासाठी
जिथं वाटतंय श्वासच थांबलाय
तो निश्वास सोडण्यासाठी

आयुष्यात तो क्षण 
कधी कधी नाही भेटणार
जिवंतपणी स्वर्ग पाहुद्या मला
पुन्हा कधीच काही नाही म्हटणार

पाणावलेल्या डोळ्यांनी फक्त
एकदा ते शब्द पाहुद्या
असे येतील कित्येक क्षण
तो क्षण तसाच अंतरात राहुद्या


अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ राहुल 
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत