फुले की मुले
फुले की मुले
आपल्याही संसारात आता
उमलावीत दोन नाजूक फुले
फुलसारखीच असावीत
दोन गोजिरवाणी मुले
एक असावं गुलाबाचं
आणि एक असावं जाईचं
मिळाली नाही बहिणीची माया
पण आगमन व्हावं ताईचं
उमटावीत घरात आपल्या आता
चीमुकली ची गोंडस पावले
मन फक्त त्या एका वेड्या
आशेमागे धावले
थोडी तुझ्यासारखी
थोडी माझ्यासारखी असावी ती
पाहता क्षणीच नजरेत आपल्या
बसावी ती
कधी होईल पूर्ण इच्छा
अंगाखांद्यावर खेळवण्याची तिला
जशी अवगत झाली कला
अक्षर जुळवण्याची मला
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233
टिप्पण्या
लाजबाव
हे स्वप्न असते प्रत्येकाचे
तुमची शब्द रचना खुपच छान असते
लाजबाव
हे स्वप्न असते प्रत्येकाचे
तुमची शब्द रचना खुपच छान असते