लग्नसोहळा

लग्नसोहळा


लग्नसोहळा आपला भारी
नवजीवनाची उंच भरारी
सजला मंडप तुझिया दारी
मज वाटला तो स्वर्गापारी

फुटली ती मग सुपारी
हळद लागली त्या दुपारी
रंग पिवळा तो चढता हाती
लाजलो होतो आपण किती

माझ्यासंगे मंदिरी चालता
ईश्वरी आशीर्वाद तो मिळता
स्वप्नी संसाराच्या तू न्हाली
लग्न घटिकेची ती वेळ झाली

पारणे फेडतो सजण्याचा थाट
हटता तो अंतरपाट
गुंफली जीवनाशी प्रेम गाठ

मंगल अष्टकांचा तो स्वर
फुले अक्षदा डोईवर

नामस्मरण ईश्वराचे
विडा मुखात 
ठरले मनाशी
ठेविन सुखात

हळदी कुंकवांनी रंगले पात्र
भटजी पुटपुटती मंगल मंत्र
घातले गळी मंगळसूत्र
धरले तुजवरी मायेचे छत्र

गळी फुलांचा हार पडला
लग्नसोहळा तो पार पडला
तुझ्यासंगे तो क्षणही रडला
ज्यावेळी तू माहेर सोडला


अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
✍✍✍✍✍✍
8424043233

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत