संकल्प नववर्षाचा

*😇 संकल्प नववर्षाचा😇* फक्त एकदा झळकायचं मला इतिहासाच्या पानात अन हृदयात जीवापाड जपलेल्या जीवलगांच्या मनात जे जे लिहलय आजपर्यन्त ते सुवर्ण अक्षरात दिसावं खाकी वर्दीतील दर्दी कवी हे नाव तुमच्या काळजात बसावं एक यावी अशी संधी कायापालट होईल जीवनाचा माझी प्रत्येक कविता मग ठाव घेईल मना मनाचा तुम्ही दिलेल्या स्फूर्तितूनच हे शब्दांचे रचले इमले सुख दुःख लपंडाव खेळून हृदयात खोलवर लपले उलगडताना अलगद इतिहासाची पाने तुमच्या परिस स्पर्शाने व्हावे माझ्या अक्षरांचे सोने नवीन वर्षात सांगा आता काय करणार संकल्प तुमच्या विशाल हृदयात मला फक्त जागा द्या अल्प तुमच्या विशाल हृदयात मला फक्त जागा द्या अल्प ❤❤❤❤ अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ (राहुल) 💫खाकी वर्दीतील दर्दी कवी💫 8424043233 ✍✍✍✍