छानशी एक कविता करावी म्हटलं
छानशी एक
कविता करावी म्हटलं
डोळ्यातील पाणी
डोळ्यातच आटलं
अटलेल्या आसवांच
हृदयाने केलं स्वागत
श्वास स्तब्ध होऊन बसला
माझ्याकडेच पाहत
पाहणाऱ्या श्वासाला मित्रांनो
शब्दात केलं कैद
कविता मग बघा बनली
अशी ही अभेद्य
अभेद्य माझ्या कवितांना मित्रांनो
तुमच्या हृदयात द्या स्थान
तुमच्या साठीच पिकवतो मी हे
शब्दांचे सुंदर रान
रान शब्दांचे असले तरी मी त्यात
माझा जीव ओतला आहे
शब्द जरी मुके असले तरी
आवाज मात्र आतला आहे
या आतल्या आवाजाला दोस्ताना
आवडीने घाला साद
नक्कीच मधुर होईल पहा हा
जीवन जगण्याचा स्वाद...
नक्कीच मधुर होईल पहा हा
जीवन जगण्याचा स्वाद...
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ (राहुल)
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो.न. 8424043233
टिप्पण्या