Happy new year 2018


Happy New YEAR 2018

असं कसं विसरू मित्रा
हे वर्ष दोन हजार सतरा
हृदयात भरवून गेला हा
दोस्तांच्या कित्येक यात्रा

काही जिवलग तर
काही मनास स्पर्शून गेले
या निरस जीवनाचे
नंदनवन करून गेले

काय नाही दिल याने 
मनासारखं सगळं घडलं
तरीही दोन हजार अठराचं
घेणं सर्वांना पडलं

असो पण पुढील वर्षात ही आपण
 दोस्ती आपली निभवायची
अन माणसं जपायची हृदयापासून
आपल्या जिवाभावाची 

सुख दुःख येतील अनेक
कित्येक येतील अडचणी
पण साथ नाही सोडायची
अश्या बिकट क्षणी

आनंदात जाओ
 सुखात जाओ
2018 मध्ये आपली 
भरभराट होवो
खाकी वर्दीतील दर्दी कवीच्या 
कविता वाचायला
ऑनलाईन नक्की या हो

✍✍✍✍
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत