अशी एक असावी कविता..
अशी एक असावी कविता...
अशी एक असावी कविता.....
पावसाच्या पहिल्या सरीमध्ये
चिंब भिजणारी
निळाभोर पिसारा फुलवत
आनंदाने नाचणारी
अशी एक असावी कविता.....
मनाला स्पर्शून
हृदयात राहणारी
प्रीतीचे गीत गुणगुणत
खळखळत वाहणारी
अशी एक असावी कविता.....
तिच्या पहिल्या भेटीची
याद देणारी
सातासमुद्रापारही प्रियेला
साद देणारी
अशी एक असावी कविता.....
चंद्राने चांदण्यावर
विरहात लिहलेली
जणू माझी प्रिया मला
घट्ट बिलगलेली
अशी एक असावी कविता.....
कधीही न संपणारी
तिची माझी प्रीत
युगानुयुगे जपणारी..
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233
✍✍✍✍
टिप्पण्या