बंदिवान मी या संसारी
बंदिवान मी या संसारी
बंदिवान मी या संसारी
तुझवीन क्षण विषारी
पीत असते काळीज भारी
माझीच मी होते वैरी
तुझवीन मी काही नाही
होई अंगाची लाही लाही
मनात येते काही वाही
तुही का ते दुरुनी पाही
मना लागला तुझा लळा
तुझ्या संगतीचा नाद खुळा
तुझा तो अल्लड चाळा
कशी विसरू माझ्या बाळा
कधी न स्वप्नात वाटले
जे नको ते दुःख भेटले
तेव्हा प्रेम मनास पटले
अन नयनी अश्रू दाटले
उरली ती इच्छा मनी
नाही आता माझे कुणी
वाट पाहते प्रत्येक क्षणी
तुमची आवडती चिमणी
✍️✍️✍️✍️✍️✍️
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो :- 8424043233
टिप्पण्या
🙏🙏👌👍