कधी संपती हे दिसे





                             *कधी संपती हे दिसे*

कधी संपती हे दिसे
मन ही झाले वेडेपिसे
क्षणही तो युगासम भासे
तुजविण जगण्या आस नसे

पाच मासाचा वनवास घडता
घरे हृदयी सोबत सोडता
विरघळले अश्रूसवे वचन तोडता
दुःखी पिंजऱ्यात काळीज कोंडता

तुजविण असे मी निराधार
तव आठवणींचा मज आधार
स्वप्नाच्या घोड्यावर मी स्वार
कीती वेदना तरी न हार

मज स्वप्न ते स्वप्नच वाटे
घायाळ करिती विरहाचे काटे
मज स्वप्नांची ती पहाट कोठे
स्वप्नांहून भासे हे बंध मोठे

पहिल्या मिलनाचा जो गंध
जाणवे श्वासातून तो सुगंध
त्या नशेत व्हाया धुंद
कधी रे संपशी हे द्वंद्व 

अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233
✍✍✍✍✍

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत