चटकदार चारोळ्या
1) तुला भेटून आल्यावर
उदास होतं मन आणखी
तुझ्याविना तूच सांग
जिवलग कोण आणखी
2) लाडात येताना तू कधी
अशी गोड लाजून जाते
न पिताच चढते मला
नयनांनी अशी पाजून जाते
3) मी कधीच रडले नाही
मला आपोआपच भरून येतं
तुमच्या विरहाच दुःख
थेंबाद्वारे सरून जातं
4) मी येईन तुझ्याकडे
काही क्षण सोबत घालवीन
प्रीतीची फुले उधळून
आसवांचे दिप मालवीन
5)तू रागावलीस की
उदास होत मन माझं
प्रश्न पडतो माझाच मला
या दुनियेत कोण माझं
6)तू असं विनाकारण
बोलायचं का टाळतेस
ओठांना त्रास नको म्हणून
अश्रू का ढाळतेस
7) तुझ्याशिवाय नाहीच
पाहिलं कुठलं स्वप्न
तुझंही आहे काम ते
नयनात तसंच जपणं
8) तोडू नको रे गोड स्वप्न
याची गोडी जगण्यात आहे
आज ती स्वप्नात आहे
या झाकल्या पापण्यात आहे
9) नातं फक्त ओठांच
मग पापण्या का मिटतात
माझ्या मनाच्या गाभाऱ्यात
असंख्य वादळे उठतात
10) शोधताना मी तुला या
भान हरपलेल्या गर्दीत
कवी मनही जागे झाले
असताना मी वर्दीत
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ (राहुल)
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233
टिप्पण्या