ओढ मातीची
नीरा नदीच्या कुशीत लपलेलं
सातारा पुणे जिल्ह्याची सीमा असणारे वीर धरणाच्या उदरात सामावलेलं एक छोटंसं सुरेख गाव
( भोळी )
एका सुरेख क्षणी टिपलेलं
हे भोळी गावचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराचे छायाचित्र⛳
आणि याच निरामाई ला उद्देशून
माझी ही कविता
जन्मला असा हिरा
तुझ्या काठावरती नीरा
तुझ्या अथांग पात्रात सामावून घे
हा जगण्याचा पसारा
तुझ्या सान्निध्यात मला
पुण्य मिळत सात जन्माचं
सार्थक वाटत मला
या भूमीत केलेल्या कर्माचं
जशी लक्ष्मी माझी आई तशी
तू हि माझी आई आहे
तुझ्या सान्निध्यात येण्याची
मलाही घाई आहे
लक्ष्मी आईच्या कुशीतून जन्मलो
शेवटी तुझ्याच उदरात यायचंय
दोन्ही आयांशी जोडलेलं नातं
जगात अजरामर ठेवायचंय
गाव माझे मानेकॉलनी
पोस्ट माझे भोळी
कधीच रिकामी ठेवली नाहीस तू
माझ्या आयुष्याची झोळी
अजय द चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233
टिप्पण्या