जाती भेद विरहित जगणं
जाती भेद विरहित जगण
माणूसच माणसाचा असा
का करतो घात
सांगा ना सांडलेल्या रक्ताची
कोणती असते जात
लहान होतो तेव्हा कधी
उमगली नाही जात
पण शिंगे फुटली अन हळूहळू
जात टाकू लागली कात
एक माणूस म्हणून जगण्याचा
करताना जीवतोड संघर्ष
कुठून झाला हा जातभेदाचा
किळसवाणा स्पर्श
खरचं एकदा मला
माणूस म्हणून जगुद्या
माणसाने माणूसपण जपलेलं
या उघड्या डोळ्यांनी पाहुद्या
मला नाही अडकायचं
या मानवनिर्मित जातीत
शेवटी मिसळायचच आहे ना
मायेनं ओथंबलेल्या मातीत
आजपासून आपली एकच जात
माणसांना हृदयात जपणं
जातविरहित या जगातून
शेवटी एकदाच खपणं
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ (राहुल)
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233
✍✍✍✍✍
टिप्पण्या