तू येशील ना नक्की...
तू येशील ना नक्की.....
तू येशील ना नक्की.....
डोळे लागलेल्या वाटेवरून
विरहात उसळलेल्या
भावनांच्या वाटेवरून
तू येशील ना नक्की.....
तुझी वाट पाहताना
या भिजलेल्या अश्रूंसोबत
तुझ्या स्मृती वाहताना
तू येशील ना नक्की.....
त्या भारल्या क्षणात
सुगंध श्वासातील देण्या
या काटेरी वनात
तू येशील ना नक्की.....
मी सांगेल तेव्हा
प्रीतीचा वसंत हा
असा फुलतो जेव्हा
तू येशील ना नक्की.....
स्वप्ने मुठीत घेऊन
सुखवशील आसुसलेल्या जीवास
असाच मिठीत घेऊन
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233
✍✍✍✍✍
टिप्पण्या