गुरू वंदना व माजी विद्यार्थी संमेलन



*गुरवंदना व माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन*


जिथे आम्ही घडलो
ती आज पुन्हा दिसणार शाळा
काय बोलावं काही सुचेना
दाटून आला गळा

तुम्ही दिलेल्या शिक्षणाची शिदोरी
आयुष्यभर ही नाही सरत
कपाळी लावावी पायधूळ तिथली
असे हे आपले विद्यालय नवभारत

भेटण्या आतुर झालेल्या जीवास
तुमचे प्रेमाचे शब्द सुखावतील
भूतकाळात विरून गेलेल्या आठवणी
इतक्या वर्षांनी पुन्हा फुलतील

विखुरलेले मित्र भेटतील
आनंदाला येईल उधाण
गुरूवर्यांच्या चरणस्पर्शाने
उजळून निघेल ही हृदयाची शान

शिक्षकरुपी अमृतधारेने
भागविली आमच्या शिक्षणाची तहान
तुम्ही शिकवा आम्हाला अन
पुन्हा होऊ आम्ही लहान

माजी विद्यार्थ्यांचा सोहळा हा
मात्र आनंद तुमच्या मनात असेल
तुमची जागा आयुष्यभर गुरुजनहो
या हृदयाच्या पानात असेल

तुमची जागा आयुष्यभर गुरुजनहो
या हृदयाच्या पानात असेल


शब्दरचना

अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत