सल मनातील





*सल मनातील*

खुल्या मनानं पहिल्यासारखी
प्रतिसाद देत नाहीत लोकं
 स्वतःच्याच पोस्ट मध्ये
आजकाल Busy त्यांचं डोकं

सर्वच सोडून देण्याच्या नादात
चांगल्या पोस्ट ला मुकता तुम्ही
काय तरी फालतू असेल म्हणून
तुच्छ नजरेनं बघता तुम्ही

कधी आई कधी वडील तर कधी
शहीद जवानांची असते गाथा
तुमच्या पर्यंत पोहचचाव सर्व म्हणून
रोज झिजतोच ना स्वतः

हृदयात उतरेल तुमच्या
आत दबलेला हा आवाज
आणि शब्दांनी सजवलेला
हा कवितेचा सुरेख साज

वाचणारे आवडीने वाचतात
त्यांचे रिप्लाय ही असतात मस्त
बाकीच्यांना मात्र त्याच काहीच
सोयर सुतक नसतं

राहा कोणत्याही ग्रुप मध्ये मात्र
या हृदयाशी राहा संलग्न
चार ओळीत कधीतरी माझ्या
भान हरपून राहा मग्न

✍✍✍✍
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत