कधी चांदण्या रात्रीत.....



                     कधी चांदण्या रात्रीत.....

कधी चांदण्या रात्रीत 
मी एकटाच बसतो
कधी तारकांकडे पाहून
खुदकन हसतो
तर कधी माझ्यातच नसतो

निळ्या आकाशी कधी 
अगणित तारका मोजतो
कधी अश्रूमध्ये चिंब भिजतो

एक तारा नकळत तुटत होता
कधी अश्रू वाटत होता
पण विसरू वाटत नव्हता

म्हणे तुटणाऱ्या ताऱ्याला
मागितल्यास मनातील इच्छा पूर्ण होते
म्हणून मीही डोळे मिटले
अन मनात म्हटले
जोपर्यंत आहेत चंद्र तारे
तोपर्यंत असावे प्रेम सारे

चंद्र कधी स्वप्नाच्या ढगाआड लपत होता
तर कधी आठवणी जपत होता
दिवसा झोपत होता आणि
रात्री जागत होता

चंद्र असा का वागतो
रात्र रात्र का तो जागतो
माझंच मुख का तो बघतो

कारण......

त्याला देखील तुझाच हाव आहे
ओठावर देखील तुझचं नाव आहे
जो तुझा तोच त्याचा गाव आहे
तो चंद्र म्हणजेच तुझा अजयराव आहे........


अजय द चव्हाण 
उर्फ राहुल 
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत