स्वर काळजीचा
स्वर काळजीचा
कर्तव्यासाठी जागरूक ते
तसेच कुटुंबासाठी ही असतात
एक नवरा म्हणून आईसाठी
वडील म्हणून आमच्यासाठी असतात
आम्ही शाळेतून यावं आणि
त्यांनी उचलून घ्यावं कवेत
असे पप्पा देवा आम्हाला
जन्मोजन्मी हवेत
कधी कधी येतो घरी पळत
पण पप्पाच नसतात घरी
ड्युटीवर असतात ते तिकडं
गोड लागत नाही भाकरी
ते देशासाठी लढतात
आमचं मोठं होत मन
त्याच्याविना सुने सुने
आमचे उत्सव सण
आईच्या डोळ्यात आतुरता
मनात काळजीचा स्वर दिसतो
तिच्या पाणावलेल्या डोळ्यात
त्यांच्या प्रेमाचा ज्वर दिसतो
मीही शूर शिपाई होईन
पप्पांसारखा देशाचा
अभिमानाने धडधडत राहील
तिरंगा या हृदयाचा
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
शब्दरचना
✍✍✍✍
अजय द चव्हाण
उर्फ (राहुल)
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233
टिप्पण्या