तू वात असावी........ मी ज्योत असावं.........
जगताना या जीवनी
तू वात असावी
मी ज्योत असावं
खरचं माझं जीवन त्या
पणतीसारखं असावं
तू वात असावी
मी ज्योत असावं
प्रेम म्हणजे तेल असावं
मी तुझ्यासाठी जळावं
तू माझ्यासाठी जळावं
आपलं आयुष्य आनंदाने उजळावं
ती प्रकाशाची किरणं
हृदयात जात असावी
तू वात असावी
मी ज्योत असावं
आपलं आयुष्य ही मग
तेवढंच राहील
वात संपून गेली की
ज्योत ही संपून जाईल
जाताना मात्र ती
प्रीत देत असावी
तू वात असावी
मी ज्योत असावं
एकचं खंत सलते मनात
वात सहवासात राहून जळते
आपण मात्र एममेकांसाठी
विरहात राहून जळतो
बहुतेक प्रेमगंगा
इथूनच वाहत असावी
तू वात असावी
मी ज्योत असावं
तुझ्या अलगद स्पर्शाने
मी सदा तेवत राहूदे
आपल्या प्रेमाच्या दाहीदिशा
सुखाने उजळत राहूदे
ती ज्योत मात्र
प्रेमगीत गात असावी
तू वात असावी
मी ज्योत असावं
शब्दरचना
दिनांक 03/02/2009
मंगळवार
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233
टिप्पण्या
वर्दी मध्ये पण एक कवी असतो एक कलाकार असतो हे तुझा कविते मधून दिसून येते सलाम दोस्ता तुझा भावनांना खरंच