अपघात क्षणाचा...... सय्यम मनाचा....




अपघात क्षणाचा...
सय्यम मनाचा.......

मित्रांनो अनमोल या जीवनाचे
असे करू नका मातेरे
हृदयातून कळकळीने 
अशी हाक येतेरे....

सावकाश आणि जपून
चालवत जा वहाने
सोडून द्या आता हे 
अतिवेगाचे बहाणे

वाहतुकीचे नियम पाळा
सिग्नल ला जरूर थांबा
सैरभैर मनावर या थोडा 
ठेवा ना ताबा

हेल्मेट घालताना असा
करू नका कंटाळा
आईच हृदय तीळतीळ
तुटत असतं ना बाळा


अपघात म्हटलं की 
काळजात होत धस्स
गाडी हाकताना तुम्हाला
आठवत नाही कस्स

मनुष्य जन्म हा
 नाही ना पुन्हा
का मग करायचा हा
जीवघेणा गुन्हा

आपल्याही पाठीमागे 
असतात पाहणारे वाट
थोडासा ठेवला सय्यम तर
होईल ना छान हा जगण्याचा थाट

होईल ना छान हा जगण्याचा थाट

अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233

टिप्पण्या

दत्तात्रय गुरव म्हणाले…
अप्रतिम रचना 👌👌
खूप छान आणि सध्याच्या परिस्थितीत तरुण युवकांना लागू होणारा संदेश आहे.
खूप खूप शुभेच्छा👍👍
khakivarditildardikavi म्हणाले…
अभारी आहोत साहेब

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत