उदासीन मन



*उदासीन मन*

खरचं वाचन संस्कृती आपली
पावत चाललीय का लोप
माणसाची मनं लिहणाऱ्याला
राहिला नाही का स्कोप 

अभिमान नावाची गोष्ट आज
विकलीय का निर्जीव जगात
आपुलकी नावाची ओढ
विरून गेलीय का ढगात 

आपल्याच माणसातील सांगा
सुकलाय का माणुसकीचा झरा
का कळत नाही त्यांना बोला
जीव ओतून फुलवलेला पिसारा

जगावेगळं करावं म्हटलं मित्रानो
मात्र अपल्यांचीच साथ नाही
आतल्या आत जीवाला जाळणारी
ही बोचरी अंधारी रात नाही

एकट्याची लढाई ही आता
एकट्यालाच लागेल लढावी
ढासळलेल्या मनाची सांगा
गाथा कोणापुढे पढावी

रोज उठसुठ जीव तोडून 
तुम्हास करतोय विनवणी
सांगून सांगून थकलो म्हणून
कवितेची ही लाजिरवाणी पर्वणी

वाटलं होतं अभिमान वाटेल
आणि उचलून घेताल कवेत
स्वप्न माझ्या मानीच राजांनो
असं विरून गेलं हवेत

काव्यसंग्रह बुकिंग करा म्हणून
आर्जव करायला ही वाटते लाज
स्वतःच्याच धुंदीत धुंद जगात
माझी जागा दिसली आज

कवी आपलाच 
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत