आत्महत्या करू नका.....
*Don't Suicide*
लहानाचे मोठे केले त्यांनी
करून जीवाची वणवण
एका अविचाराने सांगा
का संपवायचे जीवन
सांगा ना तुमीच मला
आयुष्यात दुःख कुणाला नाही
आतून सलणाऱ्या वेदना
कुठल्या मनाला नाही
आपणच अस केलं तर
त्यांनी कुणाकडे पाहायचं
डोळ्यातून येणाऱ्या आसवांना
कुणाच्या खांद्यावर सांडवायच
हुड बुद्धी असते तेव्हा ती
जबाबदारीची नसते जाणीव
एकुलत्या एक लेकाची सांगा
पुन्हा भरेल का ती उणीव
बहिणीनं सांगा ना मग
कुणा हाती बांधावी राखी
उरलेल्या आयुष्यात सांगा तिच्या
राहतच काय मग बाकी
अश्रू पुसणारे हात बघा
त्यांना ही हवे आहेत
आयुष्यभराची साथ द्या
सामावून घ्या मायेच्या छायेत
रोज तुमच्याकडे पाहूनच त्यांच्या
आनंदाला फुटते पालवी
तुमच्या नाजूक डोळ्यात ते
भविष्याची स्वप्ने झुलवी
तुमच्याकडे पाहून लोकांना
कळूद्या जीवनाचा अर्थ
मनसोक्त जगा आयुष्य हे
मनुष्य जन्म करा सार्थ
नका करू आत्महत्या
हे कळकळीचे सांगणे
तुमच्या पाठीमागे होते
वाळवंट त्यांचे जगणे
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233
टिप्पण्या