भीक स्त्रीत्वाची..
*भीक स्त्रीत्वाची*
किळसवाण्या नजरा त्यांच्या
जेव्हा फिरतात देहावरून
तुम्हीच सांगा कसं जगावं स्त्रीने
या जगात माना ताठ करून
एकटी स्त्री दिसली की त्यांना
ती संधी वाटते नामी
का देत नाही कोण सांगा
आमच्या लज्जा रक्षणाची हमी
आम्ही विरोध केला की
त्यांची जागी होते वासना
गुन्हा नसताना आमचा ही
आयुष्याची परफड सोसेना
अमानुषपणे देहाचे आमच्या
लचके तोडले जातात
आई बहिणीचे त्यावेळी का
त्यांना विसर पडले जातात
आम्ही ही कुणाच्या तरी
आहोत ना बहिणी -लेकी
खरचं या निर्दयी जगात
सहानुभूती नाही का बाकी
सन्मान व्हावा स्त्रीचा हे
विचारवंत सांगतात थोर
का मग भोगावा आम्ही हा
आयुष्याभर जीवघेणा घोर
श्वास घुसमटतो आमचा हे
असलं जीवन जगताना
लाज वाटते आमचीच आम्हास
ही स्त्रीत्वाची भीक मागताना
🙏🙏🙏🙏
शब्दरचना
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233
टिप्पण्या