आपण का खचायचं..
*आपण का खचायचं*
तुम्हीच सांगा
थकून कसं चालेल
येणाऱ्या संकटापुढे
झुकून कसं चालेल
क्षणभरांच आयुष्य त्यांचं
पण दवबिंदू पडतात ना पानावर
तसच जगायचं आयुष्य आपण
थोडसं आपल्याही मनावर
लोकांचं काय
मारतचं राहतील टोमणे
आपलं काम आहे
आपल्याच स्वप्नात रमणे
आपलं काम आपण
मन लावून केलचं पाहिजे
शब्दांना कल्पनाविश्वात
रोज नेलचं पाहिजे
ढासळलो कधी तर ते
येतात का धावून
चांगल्या कामाच्या वेळी
बसतात ना मूग गिळून
त्यांना बोलायच तर बोलुदेत
आपण का खचायच
उलट मनातल्या मनात आनंदाने
मोर बनून नाचायचं
एक दिवस आपल्या स्वप्नाचे
फुलतील मोर पिसारे
तेव्हा टाळ्या वाजवत जवळ
बघा हेच येतील सारे
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233
टिप्पण्या
पडले असंख्य जरी घाव तनु मनावर ।
आल्या भयाण आपदा जरी जीवनावर ।।
*थांबू न पाठ फिरवू न व्रतास त्यागु ।*
शिवबा संभाजी समतुल्य सदैव वागू ।।
पडले असंख्य जरी घाव तनु मनावर ।
आल्या भयाण आपदा जरी जीवनावर ।।
*थांबू न पाठ फिरवू न व्रतास त्यागु ।*
शिवबा संभाजी समतुल्य सदैव वागू ।।
पडले असंख्य जरी घाव तनु मनावर ।
आल्या भयाण आपदा जरी जीवनावर ।।
*थांबू न पाठ फिरवू न व्रतास त्यागु ।*
शिवबा संभाजी समतुल्य सदैव वागू ।।
पडले असंख्य जरी घाव तनु मनावर ।
आल्या भयाण आपदा जरी जीवनावर ।।
*थांबू न पाठ फिरवू न व्रतास त्यागु ।*
शिवबा संभाजी समतुल्य सदैव वागू ।।