रसिक हो तुमच्यासाठी
रसिक हो तुमच्यासाठी
खाकी वर्दीतील दर्दी कवीचे
हे बुकच आहे छान
वाचताना लहान थोरांचे
हरवून जातंय भान
एक एक शब्द मित्रांनो
काळजाला भिडतोय
पोलीस असूनही आतील
कवी मात्र घडतोय
मुखपृष्ठ पाहूनच राव
खुश होतायत मंडळी
वाचल्यावर नक्कीच फुलेल
तुमच्या अंतरीची कळी
प्रत्येक विषयावर त्याने
सुरेख केलंय लिखाण
तुमच्या हाती ही लागुदया
ही शब्दहिऱ्यांची खाण
हेडिंगच इतकं सुदंर तर
आत काय असेल
यातील कविता हृदयात
घर करून बसेल
आपणास आवडले बुक
यातच पावलो मी भरून
पावती स्वीकारतो कष्टाची रसिक हो
आपणास सॅल्युट करून
आपणास सॅल्युट करून
🙏🙏🙏🙏🙏🙏
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
टिप्पण्या