मित्रहो...
मित्रहो..........
तुमचा हात पाठीवर नसता तर
मी कधीच फुललो नसतो
मनातलं दुःख कधीच
शब्दातून बोललो नसतो
तुमची साथ मिळाली नसती तर..
मी कधीच स्फुरलो नसतो
या जगाच्या पोकळीत
नावालाही उरलो नसतो
तुम्ही वाहवा केली नसती तर..
मी कधीच उजळलो नसतो
जीवनाच्या अंधारात
वेदनांनी पोळलो असतो
लिहताना दरवेळी
तुमची याद सोबत नसती तर...
शब्दांना कधीच
पंख फुटले नसते
निसर्गातील मित्र सारे
कवितांमधून भेटले नसते
कदाचित...
तुमचा अंश माझ्यात नसता तर
शब्दही सारे मृत भासले असते
दुःख आमच्या अंगणी
दात विचकत बसले असते
तुम्ही मार्ग दाखविला नसता तर..
आम्ही नेहमीचाच रस्ता चुकलो असतो
चण्या फुटण्याच्या भावाने मग
बाजारात विकलो असतो
तुम्ही आवाज दिला नसता तर...
कदाचित आम्ही जागलो नसतो
मनपिसारा फुलवून मग
आनंदाने जगलो नसतो
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ (राहुल)
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो.8424043233
टिप्पण्या