संघर्ष


संघर्ष


संघर्षाची पताका घेऊन
दारोदारी फिरावं
आपलं हित कशात
आपलं आपणच हेरावं

चौफेर उधळू द्यावेत
प्रयत्नाचे वारू
ध्येय प्राप्ती झाल्याविन
नका मागे  फिरू

अपयशाची चव कदाचित
चाखावीच लागेल
कष्टाची लाज ध्येयाला
मग राखावीच लागेल

हताश निराश होऊन
थांबवू नका प्रयत्न
प्रयत्नांच्या शिंपल्यातच गवसेल
 यशाचे सुरेख रत्न

जे निंदा करतायत आज
तेच करतील जयजयकार
मात करून संकटावर
जीवना द्या नवा आकार

अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ (राहुल)
*खाकी वर्दीतील दर्दी कवी*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत