भावपूर्ण श्रद्धांजली
*भावपूर्ण श्रद्धांजली*
काळीज हळहळतं अन
अश्रू होतात अनावर
किती घाव घालताल
या पोलीस मनावर
आता येईल पहा
गणपती बंदोबस्त
रस्त्यावर तुमच्यासाठी तो
घालत असेल गस्त
इच्छा आकांक्षाचा आवळुन गळा
तो तुमच्यासाठीच झटतोय
संकटकाळात मात्र
मामा बनून भेटतोय
तुम्हीच मनात चितरलाय ना
हा सुरेख पोलीस काका
आधीच होरपोळतोय तो
आणखी डीवचू नका
हृदय पिळवटून टाकणारे
त्यांचे सपासप वार
तिला सुद्धा हवा होता ना
पोलीस पतीचा खंबीर आधार
कुठवर गावे तिनं आता
हे बेसूर जीवनगाण
भकास कपाळावरती
पुन्हा नाही ना समाधान
हल्ले खूप झाले
आता तारणारा पाहिजे
या पोलीस नावासाठी
अश्रू ढाळणारा पाहिजे
या पोलीस नावासाठी
अश्रू ढाळणारा पाहिजे...
✍✍✍✍✍✍
शब्दरचना
अजय द. चव्हाण
उर्फ (राहुल)
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो.8424043233
टिप्पण्या
म्हणजेच
राहुल उर्फ खाकी वर्दीतील दर्दी कवी
मन फार रडले असेल...
करतांना वार पोलिसांवर त्यांचेही कुटुंब असते,
हे त्याला का कळले नसेल...
मनाला स्पर्शून जाणारी भावनिक कविता सर..।।
खप खूप आभार..पोलिसांच्या भावना शब्दबद्ध केल्याबद्दल.!