पोलिसांना ही माणूस म्हणून जगुदया....



*पोलिसांना ही माणूस म्हणून जगुदया*

दगड गोट्यांचा मानकरी तो
सांगा त्याचा काय दोष असतो
कायदा सुव्यवस्थाच राखतो तो
तरीही जनतेचा रोष असतो 

गुन्हा काहीही नसताना 
त्याचा हकनाक जातो बळी
जनता मात्र तोंडसुख घेते
अश्या दुःखाच्या ही वेळी


दंगे झाले की तो धावतो 
जाळपोळ झाली की तो धावतो
असल्या ताण तणावात मित्रांनो
अक्षरशः तो कावतो 

वयक्तिक वैर त्याचं 
कधीच नसतं कुणाशी 
तरीही येणारा दगड
जखम करतोच जराशी

तो भरडला जातो नेहमी
शासन आणि जनतेच्या जात्यात
सगळेच कसे असतील ओ सांगा
बेईमान या पोलीस खात्यात

मोर्चाच्या वेळी मी ऐकलेत ते 
त्यांचे हृदयास चिरणारे शब्द 
शिव्या शाप ऐकून ही जनतेचे
त्यास रहावे लागते स्तब्ध

तो एक पोलीस आहे 
एवढाच काय तो त्याचा गुन्हा
नका करू हल्ले त्यांच्यावर
जगुदया माणूस म्हणून पुन्हा

जगुदया माणूस म्हणून पुन्हा

अजय द. चव्हाण
उर्फ (राहुल)
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो.8424043233

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
एक नंबर सर
Unknown म्हणाले…
सर अप्रतिम अविस्मरणीय,
खरंच
कार्य करण्या पेक्षा
स्थिती शब्दात सांगणं जोक नाही
एक नंबर सर
Unknown म्हणाले…
खरय शब्दांचा पलीकडे.
Unknown म्हणाले…
अतिशय सुंदर सर
Sampat Murkute म्हणाले…
एक अप्रतीम रचना व उपयुक्त
Unknown म्हणाले…
खूप छान सर👌👌👌👌

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत