भावपूर्ण श्रद्धांजली
*भावपूर्ण श्रद्धांजली*
काळाच्या खोल दरीत
मृतांचा पडला खच
अश्रू झिरपतात काळजातून
अन काळीज वेदनेने टच
शोक सागरात बुडाले असेल
कृषी विद्यापीठ दापोली
कशी मोजावी सांगा ना
टपकणाऱ्या अश्रूंची खोली
एका क्षणात असं कसं
होत्याच नव्हतं होतं
जिव्हारी लागणारी जखम
अशी कोण देऊन जातं
तेत्तीस आकडा ऐकूनच
डोळ्यासमोर येते भोवळ
श्रद्धांजली वाहण्याइतपत ही
आता बळ उरले नाही जवळ
निष्पाप बळी गेली की
चर्रर्र होतं काळजात माझ्या
वेदनेलाही कंप फुटतो
घायाळ करतात आठवणी ताज्या
मृत्यूचा सापळा ठरला
तो जीवघेणा आंबनेळी घाट
आज दुःखाने भरलाय पहा
प्रत्येक हृदयाचा काठ
💐💐💐💐💐💐💐
✍✍✍✍✍
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ (राहुल)
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो 8424043233
टिप्पण्या