बदली
बदली होतेय सर तुमची
पण काळीज आमचं तुटतंय
पुन्हा भरारी घेण्यास सज्ज
हेही आम्हास पटतंय
संयम म्हणजे काय हे
तुमच्याकडूनच शिकलो
मोठ्या मनानं माफ करा
जर आम्ही असेल चुकलो
भावनांचा मेळ न बसणे
ही एक प्रकारची व्याधीच
आपण घडविलेला प्रज्ञावंत पोलीस
डगमागणार नाही कधीच
तुम्ही नेहमीच गाठावीत सर
यशाची उंच उंच शिखरे
मात्र विसरू नयेत ही
आपल्याच कुटुंबातील लेकरे
इथून पुढचा प्रवास सर
सुखाचा होवो आपला
आपल्या आदर्श कार्याचा ठसा
आंम्ही हृदयात खोलवर जपला
शिस्त आणि प्रामाणिकपणाचं
आपण उदाहरण एक जिवंत
आपण घडविलेला प्रज्ञावंत पोलीस
एक दिवस नक्कीच होईल संत
टिप्पण्या