प्रत्येक जीवास.....
*प्रत्येक जीवास.....*
प्रत्येक जीवास जगावसं वाटतं
सोनेरी स्वप्न पहावसं वाटतं
आवडत गीत गुणगुनावसं वाटतं
प्रत्येक जीवास फुलावसं वाटतं
कुशीत तिच्या झुलावसं वाटतं
जगास साऱ्या भुलावसं वाटतं
प्रत्येक जीवास रुसावसं वाटतं
रुबाबदार दिसावसं वाटतं
एकलेपण नसावसं वाटतं
प्रत्येक जीवास उडावसं वाटत
मनासारखं घडावसं वाटत
डोळे भरून रडावसं वाटत
प्रत्येक जीवास नटावसं वाटत
अंकुर होऊन फुटावसं वाटत
आपलं माणूस भेटावसं वाटत
प्रत्येक जीवास रंगावसं वाटत
मनातलं सार सांगावसं वाटत
नशेत थोडं झिंगावसं वाटत
प्रत्येक जीवास हसावसं वाटत
दुःख कधी नसावसं वाटतं
निसर्गाच्या सान्निध्यात विसावसं वाटतं
प्रत्येक जीवास नाचावसं वाटत
आवडतं काव्य वाचावसं वाटत
केसात फुल खोचावसं वाटतं
प्रत्येक जीवास दडावसं वाटत
तिला जवळ ओढवसं वाटत
ओठाला ओठ भिडावसं वाटत
निळं चांदण सांडावसं वाटत
✍✍✍✍✍✍
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ (राहुल)
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो. 8424043233
टिप्पण्या