तू अशी....
*तू अशी....*
तू अशी दूर कशी
माझ्या गीतांचा सूर जशी
तू अशी भास कशी
माझ्या जगण्याची आस जशी
तू अशी गोड कशी
माझ्या मनाची ओढ जशी
तू अशी उरी कशी
माझ्या स्वप्नातली परी जशी
तू अशी माझी कशी
माझ्या हो ला राजी जशी
तू अशी फुल कशी
माझ्या संसाराची चूल जशी
तू अशी थेंब कशी
माझ्या प्रेमात चिंब जशी
तू अशी लाट कशी
जन्मोजन्मीची गाठ जशी
✍✍✍✍✍✍
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ (राहुल )
खाकी वर्दीतील दर्दी कवी
टिप्पण्या