मनमोरणी




*मनमोरणी*

अशी तू सुंदर मनमोरणी
आठवते ते आजोळ हरणी
धावलो आपण डोंगरावरूनी
टेकलो मस्तक शंभूचरणी

हिरव्या शालूतील ते रूप
मज भावले मनास खूप
तू बघती अन मी चूप
वाढली पंगत ती गुपचूप

तुझे लक्ष माझ्याकडे
माझे लक्ष दुसरीकडे
आपले छत्तीसचे आकडे
तुझे महादेवाला साकडे

किती तू हसविण्या बघितले
बोलण्यात फसविण्या बघितले
न बोलताच मी सांगितले
सर्व नखरे प्रिये ते रागातले

आठवते पंगत जेवणाची
अबोल प्रीत निःशब्द भावनांची
किती विनविले तू मजला
बोलपणा तो अंगी निजला

तुझ्या विनवणीने पण तो हरला
अबोलपणा तो दूर सरला
जीवनी क्षण तो सरस ठरला
आपल्या हृदयी नकळत कोरला

✍✍✍✍✍✍
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ (राहुल)
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो.8424043233

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत