ती....
ती....
जिथे बसलो होतो मी
उभी ती समोरच होती
किती कुतूहलाने ती
माझ्याकडे पाहत होती
तीचं सौन्दर्य पाहून
झालो मी थक्क
माझ्याच श्वासातून ती
अवतरली होती चक्क
पाहून तिला अक्षरशः
उर आला भरून
धन्य झालो मी पुन्हा
तिच्याशी सलगी करून
अस वाटलं क्षणभर तिला
काळजाशी कवटाळावं
तिला स्पर्श करून
पुन्हा ते सुख मिळावं
डबडबल्या डोळ्यांनी मी
फिरवला तिच्यावरून हात
इतक्या दिवस ती माझ्या
हृदयात तर होती रहात
मित्रांनो तुमच्या मनातलं
थांबवा संशयाच वादळ
हृदयातून अवतरलेली ती
वेदनेची होती कळ
जिला कविता अस एक
आहे सुरेख नाव
कुणाच्या तरी संघर्षाचा तो
एक जिव्हारी तो घाव
मित्राच्या घरात लावलेली
ती माझ्या कवितेची फ्रेम होती
तुम्हास खिळवून ठेवण्यासाठी
ही एक छोटीशी गेम होती
✍✍✍✍✍
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ (राहुल)
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो.8424043233
टिप्पण्या