मेजर कौस्तुभ राणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
*मेजर कौस्तुभ राणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली*
भारत मातेसाठी शहीद झाले
मेजर कौस्तुभ राणे
हेलावली ना पुन्हा पहा
सकल भारतीयांची मने
एकुलता एक मुलगा होता
तो त्यांच्या आईचा
इतिहास लिहला गेला पुन्हा
त्या तिरंग्याच्या शाईचा
गोळ्यांचा सामना करताना
झुकली नाही पोलादी छाती
कंठस्नान घालून दहशतवाद्यांना
शौर्याची ही जगभर ख्याती
नात्या गोत्यापेक्षाही जेव्हा
श्रेष्ठ असते बलिदान
अभिमानाने भारतीयांची
उंचावणारच ना मान
देशभक्ती साठी सांगा ना
असते का कोणती जात
श्रद्धांजली वाहण्यास ही आता
धजावत नाहीत हात
मातृभूमीसाठी सांडलेल्या रक्ताचे
हृदयात अढळ असावे स्थान
त्यांच्यामुळेच सुरक्षित आहेत
आपल्या देहातील प्राण
🇮🇳जय हिंद🇮🇳
✍✍✍✍✍✍
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ (राहुल)
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो.8424043233
टिप्पण्या