नक्षलविरोधी लढा....
*नक्षलविरोधी लढा*
किती सहन करायचं
किती सोसायचं
अस नाक कापल्यागत
कुठवर बसायचं
सैतान बनून येतात ते
उधळून लावतात सरकारी योजना
ज्या तुमच्याच विकासासाठी
असतात प्रियजना
नक्षल्यांच्या आमिषाना
आता नाही फसायच...
फक्त स्वार्थासाठी स्वतःच्या
करतात अमानुष कृत्ये
मारून पोलिसांनाच सांगा
कोणती कामगिरी करतात फत्ते
देऊ नक्षलवाद्याविरुद्ध लढा
असचं मनात ठसवायचं...
रात्रंदिवस झटतात पोलीस
फक्त तुमच्याचसाठी
ते शाहिद झाले फक्त
तुमच्याच साठी
अश्या बलिदानाला
नाही कधी विसरायचं....
नाही घाबरून चालणार
त्यांच्या या अन्यायाला
तुम्हीही नका देऊ साथ
त्यांच्या अघोरी कृत्यांना
पुकारून बंड त्यांच्याविरुद्ध
गाव विकसीत करायचं
तुम्हीही विरोध करा नक्षल्यांना
होऊन सारे एक
संपवून नक्षलयांचे नामोनिशाण
काम करू नेक
अश्या राक्षसांना संपविण्या
नाही आता गप्प बसायचं...
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ (राहुल)
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो.8424043233
टिप्पण्या